HW Marathi
मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली, ४० ते ५० जण अडकल्याची भीती

मुंबई | डोंगरीत ४ मजली  केसरबाई इमारतीचा अर्धा  भाग कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीचे नाव केसरबाई असून या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळीच्या दिशेने एनडीआरफची टीम रवाना दिला आहे.

ही चार मजली इमारत आज (१६ जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास या इमारतीचा भाग कोसळला. या इमारतीत १० ते १५ कुटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या जास्त असल्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान, मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती.  या यादीत ही इमारत होती का, असेल तर ती कोणत्या वर्गातील होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Related posts

गिरगावच्या कोठारी हाऊस इमारतीला आग

धनंजय दळवी

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर  टिका करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

News Desk

‘त्या’ पाचही मुली सापडल्या…

News Desk