HW News Marathi
मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली, ४० ते ५० जण अडकल्याची भीती

मुंबई | डोंगरीत ४ मजली केसरबाई इमारतीचा अर्धा भाग कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीचे नाव केसरबाई असून या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळीच्या दिशेने एनडीआरफची टीम रवाना दिला आहे.

ही चार मजली इमारत आज (१६ जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास या इमारतीचा भाग कोसळला. या इमारतीत १० ते १५ कुटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या जास्त असल्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान, मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. या यादीत ही इमारत होती का, असेल तर ती कोणत्या वर्गातील होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi |गोविंदा पथक करणार शहीद सैनिकांच्या कुटुंबाला मदत

News Desk

पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली अभिनेते धर्मेश व्यास यांची फसवणूक; ओशिवरा सायबर सेल पुन्हा अॅक्शन मोडवर

Chetan Kirdat

गोखले पूल दुर्घटनेनंतर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लुट

News Desk