HW News Marathi
मुंबई

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातर्फे कुर्ला बंद

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज ९ ऑगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक शाळा महाविद्यालयात सुट्टी देखील देण्यात आली आहे. तर कुर्ला पश्चिमेला मराठा समाजातर्फे मुंबई बंदला उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. कुर्ल्यामधील मराठा समन्वयकांनी सर्वेश्वर मंदिर, कुर्ला स्टेशन परिसर कडकडीत बंद करण्यात आला. यामध्ये आंदोलनात ४५० ते ५०० कार्यकर्ते होते. शांततेच्या मार्गाने कुर्ल्यात आंदोलन करण्यात आले.

सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून मराठा आंदोलकांकडून मुंबईतही बंद पाळण्यात येत आहे. या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी अद्याप बंदाचा फारसा परिणाम अद्याप मुंबई शहरावर झालेला नाही. यावेळी मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. तसेच अन्य वाहतूक व्यवस्थाही नेहमीप्रमाणे सुरु आहे. खाजगी आणि सरकारी आस्थापने व्यवस्थित सुरु आहे. परंतु कर्मचाऱ्यांची रेल्वे, बस आणि अन्य वाहतुकीच्या ठिकाणी रोजच्या सारखी गर्दी नाही. यामुळेच या बंदचा कोणताच परिणाम मुंबईवर झालेला नसल्यामुळे मुंबईचे जनजीवन सुरळीत सुरु आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर काल मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांदरम्यान एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला आज महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार लोकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगत या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा आणि या शहरांमध्ये केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्यात गेल्या २१ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण डोंबिवलीत धावणार महिलांसाठी तेजस्विनी बस

News Desk

गांधीजींचे छायाचित्र हटवून सरकारने केला राष्ट्रपित्याचा अवमान

News Desk

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी बालवाडीच्या हद्दपारीचा घाट

News Desk