HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई

आरे मेट्रो कारशेड वाद : पर्यावरणप्रेमींचं मध्यरात्री आंदोलन

मुंबई | आरेतील कथित झाडे तोडल्याच्या निषेधार्थ ‘सेव्ह आरे’ ( Save Aarey ) या मोहिमेतील काही पर्यावरणप्रेमी गुरुवारी (28 जुलै) रात्री उशिराआरे पिकनिक पॉइंटजवळ दाखल झाले होते. यावेळी संतप्त झालेल्या पर्यावरणप्रेमींनी परिसरात आंदोलन केले.

रात्री 8.30 वाजता सुरू झालेल्या आणि रात्री 11.15 पर्यंत चाललेल्या या आंदोलनात जवळपास 100 लोक सहभागी झाले होते.

रविवारी सकाळी 11:00 वाजता नियोजित आंदोलनात बदल का केला याबद्दल HW न्यूजने विचारले असता, आंदोलकांनी सांगितले की, “या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बाकी असताना कायदेशीरपणे होत असलेली वृक्षतोड थांबवण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन करण्‍यापूर्वी पूर्वपरवानगी अपेक्षित असल्याने पोलिसांनी अनेक वेळा आंदोलकांना जागा रिकामी करण्‍याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी झाडे छाटली जाणार नसल्‍याचे आश्‍वासन देऊनही आंदोलक हलले नाहीत. नंतर 2019 पासून या चळवळीचा भाग असलेल्या कार्यकर्त्यांपैकी एकाने आंदोलकांना साइट सोडण्याचे आवाहन केले आणि मग आंदोलन संपले.

आदल्या दिवशी गुरुवारी पुन्हा एकदा ‘सेव्ह आरे’तील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुमारे 15 ते 20 जणांना ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची ही आठवड्यातील दुसरी वेळ होती.

सूत्रांचे म्हणणे आहे की कार्यकर्ते कारशेडच्या जागेजवळ जमले होते आणि झाडे तोडण्यास विरोध करत होते. मात्र, काही वेळातच पोलिसांनी हे आंदोलन शांत केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

News Desk

घरकुल घोटाळा : गुलाबराव देवकर यांच्या जामीन अर्जावर २६ सप्टेंबरला सुनावणी

News Desk

त्या भगिनीला काय सांगू! इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे – जयंत पाटील

News Desk