HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

त्या भगिनीला काय सांगू! इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे – जयंत पाटील

गोंदिया | काल एका भगिनीने ते BHEL चालू करा म्हणून आग्रह धरला पण त्या भगिनीला काय सांगू! इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे असा टोला लगावतानाच एक ग्रामीण भागातील सामान्य महिलेचा प्रश्न केंद्रसरकारला कळत नाही का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गोंदिया येथील सभेत केला.

आज पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. युपीए सरकारच्या काळात २० पैसे वाढले तरी विरोधक बोंबाबोंब करायचे मात्र गतवर्षी पेट्रोल १२ रुपयांनी वाढले आहे. आता कुठे आहेत ? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला.

गोंदियाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना साथ दिली आहे. इथल्या जनतेच्या आशिर्वादाने या भागात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. एक वेळ होता की बरेचजण पक्षातून बाहेर पडत होते, आम्हाला त्यांच्या विनवण्या कराव्या लागत होते. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. अनेक तरुण पक्षाकडे वळत आहेत आणि अशाच जिद्दी तरुणांची आम्हाला गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

खासदार प्रफुल पटेल यांनी नेहमीच इथल्या विकासासाठी पाठपुरावा केला आहे. धापेवाडा प्रकल्पाच्या कामासाठीही ते सतत संपर्कात आहेत म्हणून येणाऱ्या आर्थिक वर्षात धापेवाडा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १०० कोटी रुपये आणण्याचा प्रयत्न करू त्याच पद्धतीने पुढच्या टप्प्यांचेही काम केले जाईल असे आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

पाण्याशी संबंधित इतरही काही मागण्या खासदार प्रफुल पटेल यांनी केल्या आहेत. २०२४ पर्यंत प्रफुल्ल पटेल यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या तालुक्याला प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नातून मुबलक पाणी साठा देण्याचा प्रयत्न करू असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आदरणीय पवार साहेबांची जिद्द होती… चिकाटी होती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. निवडणुकांच्या काळात अनेकजण सोडून गेले मात्र कार्यकर्त्यांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला परिवार टिकवून ठेवला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांशी संपर्कात आहोत… आठवड्यातून एकदा कार्यकर्ता… पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या जातात… आदरणीय पवारसाहेबांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वच कार्यकर्ते झपाट्याने काम करत आहोत. येत्या २०२४ सालापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गोंदियात एक ताकदवान पक्ष ठरणार यात शंका नाही असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

Related posts

शिवसेनेवर टीका करणे किरीट सोमय्या यांना महागात पडणार का ?

News Desk

निपाणीजवळील तवंदी घाटात भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

News Desk

“ये है उद्धव का ‘नया’ महाराष्ट्र” !!, नितेश राणेंची सरकारवर टीका

News Desk