HW News Marathi
मुंबई

चला…चला..बाहेर..या साहेब….आले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीव्हीआयपी कल्चर नष्ट करण्यासाठी मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिवे हटवण्याच निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे अनेक नेत्यांनी आपल्या गाड्यांवरील लाल दिवे हटविले. भाजप सरकराने लाल दिवे हटवण्याच निर्णय का घेतला, याचे कारण त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांना अजून कळाले नाही वाटते. या मंत्र्यांनी फक्त गाड्यांवरचे लाल दिवे हटविले असून या दिव्याबरोबर मंत्र्यांच्या डोक्यातील सत्तेचा माज हटविणे हा या मागील उद्देश होता.

वडिलधाऱ्यांचा आदर करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. पण, काही सत्ताधारी मंत्र्यांना आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला दिसत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी मंत्रालयात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भाजपचे कार्यकारिणी सदस्य सेशाद्री चारी आपल्या सहकार्यांसोबत सहाव्या मजल्यावरील कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंकर यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी ते लिफ्टमध्ये चढले. ही लिफ्ट वरच्या दिशेने जाताना अचानक दुसऱ्या मजल्यावर थांबली. पण, दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमधील कोणालाच उतरायचे नव्हते. लिफ्टच्या जवळ काही लोक आली आणि ‘चला…चला…बाहेर या… साहेब….आले!’ ‘उतरा…उतरा…चला…बाहेर या…’ नक्की हा सर्व प्रकार काय आहे. हे कोणाला काही कळतच नव्हते. तेवढ्यातच शिवसेनेचे राज्यमंत्री विजय बापू शिवतरे लिफ्टमध्ये घुसले. या मंत्र्यांनी ज्या वयोवृध्द व्यक्तींना लिफ्ट मधून बाहेर काढले. त्यांना माफीचा एक शब्द ही न बोलता ते आपल्या सहकार्यांसोबत लिफ्टमधून निघून गेले.

भाजपच्या सत्तेचा पाया रचण्यापासून ते सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होईपर्यंत पक्षाशी एकनिष्ट राहणाऱ्या सेशाद्री चारींसारख्या व्यक्तीचा भाजपच्या मंत्र्यांना यांचा विसर पडला आहे का? तुम्हाला खुर्चीचा ऐवढाच माज आला आहे का? की, तुमच्या नजरेत आता सामान्यांची किंमत कवडी मोलाची झाली आहे का? असा सवाल येथे उपस्थित राहत आहे. तुमच्या सत्तेतील मंत्री वयोवृद्ध व्यक्तींना अशी वागणूक देणे हे योग्य वाटते का?

बाळासाहेब ठाकरेंची सेना ही सामान्य जनतेसाठी लढणारी सेना होती. सर्व सामान्याचा नेता म्हणून बाळासाहेबांची ख्याती होती पण, आता सेनेचे चित्र बदलले असून हा बाळासाहेबांच्या तत्वावर चालणार पक्ष आहे का ? असा सवाल तुम्हा आम्हाला वाटणे सहाजिकच आहे. तुम्ही स्वत:ला शिवबांचे मावळे म्हणून घेता, हेचे मावळे सत्तेवर आल्यानंतर सामान्य जनतेला विसरुन जातात.

शिवसेनेचे मंत्री विजय शिवतरे यांसारख्या मंत्र्यांनी विसरता कामा नये की, या सामान्य जनतेने तुम्हाला निवडून दिल्यामुळे तुम्ही सत्तेत आले आहात. समाजातील समस्या दूर करण्यासाठी जनता आपला प्रतिनिधी निवडणून देते. जेणे करुन सामान्या जनतेच्या समस्या हे तुम्ही विसरु नका. तसेच शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियातून प्रवास करताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारले होते. या प्रकरणामुळे एअर इंडियाने गायकवाड यांच्यावर प्रवास करण्यास बंदी घातली होती.

सेशाद्री चारी यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्यांच्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारला होता. पण, फडवणीस यांनी त्यांच्या ट्विटला देखील उत्तर दिले नाही. म्हणजे आता मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीशी माणुसकी सुद्धा शिल्लक राहिली नाही का? त्यांनी साधी विचारपूस देखील केली नाही. ज्या पध्दतीने केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रमाणे लाला कृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी अशा जेष्ठ नेत्यांना पक्षाने बाजूला केले आहे. त्याचप्रमाणे राज्यात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही सुद्धा हेच करत आहेत. तुम्ही यांसारख्या दिग्गज नेते मंडळींचा आदर करत नाही तर मग आम्ही तुमच्यासमोर काय? आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचा एकच प्रश्न आहे की, ‘कुठे नेवून ठेवलाया’ महाराष्ट्र माझा….

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेतन्याहून भेटले बॉलिवूड तारकांना, म्हणाले जय महाराष्ट्र

swarit

मध्यावधी निवडणुका झाल्या तरीही विजय आमचाच – अमित शहा

News Desk

काँग्रेसचे कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk