HW Marathi
मुंबई

लाईफलाईन ठरतेय डेथलाईन

मुंबई | नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात होऊन आठवडा उलटला नाही तर काही घटनांनी मन सुन्न करून टाकले आहे. मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाते. परंतु २०१९ च्या या सुरुवातीच्या ८ दिवसांचा आपण आढावा घेतला तर लक्षात येत की ८ दिवसांमध्ये सुमारे १९ लोकांचा लोकलमधून पडून किंवा ट्रॅकखाली पडून मृत्यू झाला आहे. मुंबई लोकल हा मृत्यूचा सापळा बनला आहे.

नवर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ५ ते ६ जानेवारीला १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दरम्यान २० जण लोकमधून पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईची लोकल ही डेथलाइनच ठरताना दिसून येते आहे. शनिवार (५ जानेवारी) दादर रेल्वे स्थानकात १, कुर्ला ३, कल्याण १, चर्चगेट १, अंधेरी १, बोरीवली १, पालघर १ अशा एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला.

तसेच रविवार (६ जानेवारी) देखील एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला असून  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी एक, कुर्ला या ठिकाणी एक, कल्याणला दोन,वडाळा या ठिकाणी एक, वाशीला एक, मुंबई सेंट्रल या ठिकाणी एक, अंधेरीत एक आणि बोरीवलीत एक अशा एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच सोमवार (७ जानेवारी) अंधेरी स्टेशनला एकाचा मृत्यू झाला. आता मात्र गेल्या काही दिवसात हा प्रवास धोकादायक होतो आहे असेच दिसून येते आहे. गेल्या तीन दिवसात विविध स्थानकांवर झालेल्या अपघातांमध्ये १९  प्रवाशांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले आहेत. मुंबई ट्रेन अपडेट्स या ग्रुपवर ही माहिती पोस्ट करण्यात आली

 

 

Related posts

सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी – चंद्रकांत पाटील

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

धनंजय दळवी

अंधेरी पूल दुर्घटनेसाठी पालिका जबाबदार | मुंबई हायकोर्ट

News Desk