HW News Marathi
मुंबई

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

मुंबई | अंधेरी रेल्वेस्थानका जवळील पुलाचा काही भाग कोसळल्याने लोकल सेवा ठप्प. अंधेरी-विलेपार्लेदरम्यान असलेल्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. यामुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. मंगळवारी सकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास अंधेरी-विलेपार्लेदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून वाहतूकीच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रेल्वेकडून देण्यात आलेले मदत क्रमांक

  • अंधेरी- 022676 30054
  • चर्चगेट – 02267622540, 02222082809
  • बोरिवली- 02267634053, 02228051580
  • मुंबई सेंट्रल- 02267644257

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील गोखले ब्रीजचा काही भाग कोसळला: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक (बेस्ट) विभागाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बोरिवली ते चर्चगेट दरम्यान 14 अतिरिक्त बस चालविण्यात येणार आहेत.

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे मंगळवारी सकाळी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीच्या कामात गती वाढवण्याकरता निर्देशित अधिकारी आणि इतर विभागांशी संपर्क साधून वाहतूक पुन: सुरू करा. तसेच या प्रकरणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांना चौकशीचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत.

 

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील गोखले पुलाचा काही भाग कोसळला आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ टीम, श्वान पथकासह हजर झाली आहे. आतापर्यंत ढिगा-याखालून 2 जणांना काढण्यात आले असून एकूण 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अद्याप बचावकार्य सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करणी सेनेचे सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालया बाहेर आंदोलन

News Desk

मुंबईतील जेल भरो आंदोलनाला अल्प प्रतिसाद

swarit

मराठा आरक्षण अहवाल १५ नोव्हेंबरला सादर होणार, पुढील सुनावणी १० सप्टेंबरला

News Desk