HW News Marathi
मुंबई

लोकल घसरली; ३ जखमी

मुंबई : देशभरात अनेक ठिकाणी सातत्याने होत असलेल्या रेल्वे अपघातांमुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना राजीनामा द्यावा लागलाअसतानाच आता मुंबईतही लोकल रुळांवरून उतरली आहे.

विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच मुंबईतील लोकलवर हे विघ्नआले आहे. अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानच्या हार्बर मार्गावर शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास लोकलचेचार डबे घसरले आहेत. यात एका महिलेसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत.या अपघातामुळे हार्बर मार्गावरील पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातग्रस्त लोकल सीएसएमटीहून अंधेरीच्या दिशेनंचालली होती. हार्बर व पश्चिम मार्गाला जोडणाऱ्या माहीम स्थानकाजवळ ट्रॅक बदलताना ही घटना घडली. गणेश चतुर्थीमुळे सुट्टीचादिवस असल्याने सुदैवाने लोकलला फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे जखमींचा आकडा वाढला नाही. मात्र लोकलमधून गणपतीआणणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेजर कौस्तुभ राणे शहीद, मीरारोडवर शोककळा

News Desk

मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

News Desk

अक्षयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

News Desk