HW News Marathi
देश / विदेश

लाडक्या अभिनेत्यासाठी बनविली चक्क ५७ किलोची इडली!

चेन्नई : आपल्या लाडक्या अभिनेत्याविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते काय करतील याचा काही नेम नाही. तामिळ अभिनेते अजित कुमारच्या एका फॅनक्लबने तब्बल ५७ किलोंची इडली तयार केली आहे. या मोठाल्याइडलीवर त्यांनी अजित कुमार यांचा चेहराही कोरला आहे.

काल अजित कुमार यांचा ‘विवेगम’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला. अजित यांचा हा ५७ वा चित्रपट असल्याने ही ५७ किलोंची इडली तयार करण्यात आली आहे. ही इडली चेन्नईच्या रॉयापूरममधील भारत थिएटर येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. ही इडली तमिळनाडू सामैयाल कलाई तोलीजालर मुनेत्र संगम यांनी बनवली आहे. त्यांनी याआधी अब्दुल कलाम, तामिळ कवी भरतीयार,मदर तेरेसा, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज यांचाही चेहरा इडलीवर कोरला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात दाखल

News Desk

प्रा. अभय अष्टेकर यांना आइन्स्टाईन पुरस्कार

News Desk

नापासांची चालढकल अखेर रद्द

News Desk