HW News Marathi
मुंबई

चालत्या लोकल मध्ये ‘किकी चॅलेंज’, तरुणाचा शोध सुरू

मुंबई | जगभरात सध्या सोशल मीडियावरून तुफान व्हायरल होत असलेल्या ‘किकी चॅलेंज’चे वेड आता मुंबईतही दिसून येत आहे. खरंतर चालू चार चाकी गाडीमधून बाहेर येऊन ‘किकी डू यू लव्ह मी’ या गाण्यावर डान्स करतांना आपल्याला अनेक व्हिडीओ आपण पाहिल्या असतील. पण मुंबईतील एका तरुणाने चक्क लोकल मध्ये हे ‘किकी चॅलेंज’ केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर एका तरूणाने ‘किकी चॅलेंज’चा व्हिडिओ शूट केला आहे. चालत्या ट्रेनमधून ‘किकी चॅलेंज’ केलेला त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील मुलाचा मुंबई पोलीस शोध घेत असून इतरांनी असे न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडियावरून ‘किकी चॅलेंज’ तुफान गाजत आहे. या चॅलेंजमध्ये रॅपर ड्रेकने इन माय फिलिंग या गाण्यावर चालत्या गाडीतून उतरून डान्स करतात. या गाण्याचे बोल ‘किकी डू यू लव्ह मी’ असे असल्याने या चॅलेंजला ‘किकी चॅलेंज’ नाव देण्यात आले. चालू गाडीतून उतरून गाडीच्या बाहेर डान्स करणे जीवाला धोकादायक आहे. मुंबईतही अनेक जण ‘किकी चॅलेंज’ करत व्हिडिओ काढत आहेत. परंतु यात जीवाला धोका असल्याने मुंबई पोलिसांनीही असे न करण्याचे आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या भूमिका सिंगची आत्महत्या

News Desk

घर देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी, माहुल प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली पत्रे !

News Desk

एअरटेलतर्फे आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सच्या वेळेआधी डिलिव्हरीला सुरुवात 

News Desk