मुंबई दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना रेल्वे मंत्रालयाने खुश खबर दिली आहे. यापुढे मुंबई रेल्वे पोलिसांना लोकल रेल्वेमधून मोफत प्रवास करता येणार आहे. मात्र लोकमधून प्रवास करताना गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. रेल्वे पोलीस दलाने नुकताच हा निर्णय घेतला असून पश्चिम व मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना याची माहिती देण्याची आली आहे.
मुंबई पोलीस लोकलमधून विनातिकीट तसेच अपंगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून सर्रासपणे प्रवास करतात, त्याबाबत‘टीसी’कडून कारवाई करताना वादावादीच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत रेल्वेने अनेकवेळा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कळविले होते.
त्याच अनुषंगाने याबाबत दोन्ही घटकांतील अधिका-यांमध्ये ३० सप्टेंबरला बैठक झाली होती. त्यामध्ये तपासकामासाठी गणवेषावर प्रवास करणा-या पोलिसांना मोफत प्रवास करण्याची मुभा असावी, असा प्रस्ताव बनविण्यात आला. त्याला रेल्वे पोलीस दलाच्या महासंचालकांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती अधिका-याने एका परिपत्रकाद्वारे प्रशासनाला कळविले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post