HW News Marathi
क्राइम मुंबई

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण; आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारपासून व्हायरल होत आहे. या प्रकरणी माजी कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि युवासेना सोशल मीडियाची जबाबदारी असलेले साईनाथ दुर्गे यांनी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे ताब्यात घेतले. असून या प्रकरणी पोलिसांनी अजून चार-पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती माध्यमातून समोर आली आहे.

तसेच शीतल म्हात्रेंचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हाट्सअप ॲपवर पाठविणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तर दहिसर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थितीत आहेत. यामुळे पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून  पोलिसांनी कडेकोठ बंदोबस्त ठेवला आहे.

प्रकाश सुर्वेच्या मुलांनी आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल हा मॉर्फ करण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलीस स्थानकात तक्रार केली असून या प्रकरणी दहिसर पोलिसांनी फेसबुक कंपनी सुद्धा पत्र पाठविले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुंबई विमानतळावरून साईनाथ दुर्गेला ताब्यात घेतले. या प्रकरणी शीतल म्हात्रेंनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर आरोप केले होते. या रॅलीदरम्यान मुख्यमंत्री, शीतल म्हात्रे, प्रकाश सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते जीपमध्ये असताना एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ मॉर्फ करून बदनामी केल्याचा आरोप ठाकरे गट केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी पत्रकार परिषदेतून केला.

 

नेमके काय आहे प्रकरण

गोरेगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली शनिवारी (11 मार्च) आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते. या रॅलीदरम्यान मुख्यमंत्री, शीतल म्हात्रे, प्रकाश सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते जीपमध्ये असताना एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ मॉर्फ करून बदनामी करण्यासाठी ठाकरे गट आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी शीतल म्हात्रेंनी केला.

 

Related posts

उल्हासनगरच्या धुरू बारवर छापा

News Desk

ठाण्यात पालिका पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला-तीन जण जखमी-दोघांना घेतले ताब्यात

News Desk

माहुल प्रकल्पग्रस्तांचे ‘जीवन बचाव आंदोलन’

swarit