नवी दिल्ली | पाकच्या कलाकारना भारतात काम करण्यावरुन राजकीय नेत्यांनी त्याला विरोध केला होता. पण, पाकिस्तानातील कराची येथे २९ मार्च ते १ एप्रिल दरम्यान पहिल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीतील नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा ऐकमेव मराठी सिनेमाची निवड या फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली आहे.
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली २: द कन्क्लूजन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना फेस्टिव्हलसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी एस. एस. राजामौली खूप उत्सुक आहेत. या संदर्भात राजामौली यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट करुन सांगितले आहे.
Baahubali has given me opportunities to travel to a number of countries… The most exciting of them all is now, Pakistan. Thank you Pakistan international film festival, Karachi for the invite.
— rajamouli ss (@ssrajamouli) March 28, 2018
या फेस्टिव्हलमध्ये डिअर जिंदगी, आंखो देखी, हिंदी मिडियम, कडवी हवा, नील बांटे सन्नाटा या बॉलिवूड सिनेमाची निवड करण्यात आली आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.