HW News Marathi
मुंबई

म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई । दिवाळीच्या मुहूर्तावर ‘म्हाडा’ने मुंबईत घर घेणार्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे. १३८४ घरांच्या लॉटरीसाठीची आज(५ नोव्हेंबर) जाहिराती प्रसिद्ध झाली आहे. आजपासून घरासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी आज (५ नोव्हेंबरला) दुपारी दोन वाजल्यापासून अर्ज भरता येणार आहेत.

१० डिसेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर १६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता १३८४ घरांसाठी सोडत निघणार आहे. म्हाडाने या वर्षी घरांसाठी किमतीचे नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती यंदा २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. मुंबईतील ग्रांट रोडमध्ये म्हाडाच्या एका घराची किंमत ५ कोटी ८० लाखांवर आहे. तर सर्वात स्वस्त घराची किंमत १४ लाख ६२ हजार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चहा पिताना धक्का लागल्यामुळे पुण्यात तरुणाचा खून

News Desk

रामनाथ मोते यांना शिक्षक, मुख्याध्यापकांचा पाठिंबा

News Desk

आज पश्चिम-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

News Desk