HW News Marathi
मुंबई

लोअर परळ पूल तोडण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात

मुंबई | दुरुस्तीच्या काणास्तव बंद ठेवण्यात आलेला लोअर परळचा पूल उद्या सोमवारी (२० ऑगस्ट) तोडण्यात येणार आहे. सोमवारपासून पूल तोडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

पालिकेला २० ऑगस्टपर्यंत या पुलावरील युटीलिटी वायर्स काढण्यासाठीची मुदत रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. या पुलाखाली असणाऱ्या घरांनाही २० ऑगस्टपर्यंत रिकामे करण्याची मुदत दिली आहे. हा पूल तोडण्यासाठी ७.२ कोटींचे टेंडर पश्चिम रेल्वेने मंजूर केले असून उद्यापासून पुलावरील डांबर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

अंधेरी पूर्व दुर्घटनेनंतर आता लोअर परळचा पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे १७ जुलैपासून हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या पुलाची आयआयटी मुंबई, महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने प्राथमिक सुरक्षा तपासणी केल्यानंतर हा पूल तातडीने बंद करण्याची सूचना देण्यात आल्या होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

News Desk

केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईत दाखल होणार; उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार

Aprna

चक्क ट्रक चोरी करून गुजरातला पळाले अन्…; पहा कसं पकडलं मुंबई पोलिसांनी

Chetan Kirdat