HW News Marathi
मुंबई

महाराष्ट्र बंद मागे, दोषींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यभरात मोठी आंदोलने होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली होती. सोमवारी रात्रीपासूनच शहरातील आंबेडकरी वस्त्या अस्वस्थ होत्या. मंगळवारी सकाळी वस्त्यांमधून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर या शहरांत दगडफेक, रास्ता रोको, तोडफोडीचे काही प्रकार घडले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-मुरबाड मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील

News Desk

गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी केले बदल

News Desk