HW News Marathi
मुंबई

मालाडच्या सोमवार बाजारमध्ये आग

मुंबई | मालाडच्या सोमवार बाजारमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. मालाड पश्चिमेला असलेल्या सोमवार बाजार या परीसरातली ही घटना आहे. सध्या घटना स्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या हजर झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. मालाडच्या या भागात अनेक लाकडांची गोदामे देखील आहेत. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.

सध्या आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेल्या परिसरात अनेक लहानमोठी दुकाने आहेत. हा भाग पश्चिम द्रुतगती मार्गापासून साधारणत: दोन किलोमीटर दूर आहे. आग लागलेल्या गोदामात कोणीही अडकल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

घाटकोपर साई दर्शन इमारतीतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी दोन लाख

News Desk

सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या…!

News Desk

आधुनिक यंत्र युगातही वाचन संस्कृती लोप पावणार नाही …

News Desk
देश / विदेश

ऐकावे ते नवलच ‘आदर्श सून’ होण्याचा कोर्स

News Desk

वाराणसी । सासू-सून म्हटले की आठवताती त्यांच्यातील भांडणे-वाद हे काही आपल्या सर्वांसाठी नवीन नाही. प्रत्येक मुलगी लग्न करताना आदर्श सासूची अपेक्ष करते हे तर सर्वांनाच माहिती आहे. लग्ननंतर मात्र या सासूचे स्वप्न भंगते. परंतु आता हे चित्र बदलणार आहे बरे का? आता ते कसे तर वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी विभागाकडून मुलींना ‘आजर्श सून’ बनविण्यासाठी चक्क प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणासाठी मुलींना तीन महिन्याचा कोर्सपुर्ण करावा लागणार आहे.

खासगी संस्था आणि डॉटर्स प्राईड-बेटी मेरा अभियाना अंतर्गत हा कोर्स तयार करण्यात आला आहे. या तीन महिन्याच्या कोर्समध्ये मुलींना आत्मविश्वास, कौशल्य, समस्या सोडविण्याचे कौशल्य, तणावाच्या प्रसंगी दाखविले जाणारे गुण, कम्प्युटरस आणि फॅशनची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर लग्नाचे कौशल्य आणि सामाजिक गुण शिकविले जाणार आहेत.

जगासमोर हे एक उत्तम उदाहरण बनू शकते. यासाठी लवकरच विभागाकडून विद्यार्थिनींची निवड करुन तयारी सुरू केली जाणार असल्याची माहिती यंग स्किल्ड इंडियाचे सीईओ नीरज श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. तसेच वनिता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईनमध्ये या कोर्सची सुरुवात केली जाणार आहे.

Related posts

मोदींना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी

swarit

आशियातील पहिली ‘यंगेस्ट आर्यन मॅन’ रविजा सिंगल

News Desk

सुशांतच्या मृतदेहाचे फोटोज व्हायरल, महाराष्ट्र सायबर सेलचा कडक इशारा

News Desk