HW News Marathi
मुंबई

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमास एन वॉर्ड मधून आजपासून सुरुवात

मुंबई। मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा  नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी-सूचना जाणून घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमाची आज (६ ऑक्टोबर)  ‘एन वॉर्ड’ मधून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात  जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केले आहे.

 

 

यावेळी  नागरिकांना  आपल्या समस्या पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून सांगता येतील व ती समस्या सोडवण्यासाठी अर्ज ही देता येणार आहे. अर्जामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. थेट बाधित व्यक्ती अथवा समूहाकरिता / Directly Affected Person or Group, अर्जदाराचे नाव / Name :,मोबाईल क्रमांक / Mobile No., संपूर्ण पत्ता / Full Address :, ई-मेल आयडी / Email Id :, लोकसभा क्षेत्र / Loksabha Area, विधानसभा क्षेत्रसभा / Assembly Area, बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड / BMC Ward, निवडणूक वॉर्ड क्रमांक / Election Ward No, तक्रार – समस्या विभाग / Complaint Department : 17 A) जिल्हाधिकारी B) तहसीलदार C) बृहन्मुंबई महानगरपालिका D) पोलिस E) रेल्वे)आरोग्य G) SRAH) म्हाडा 1) स्वच्छता ) रेशनिंग K) महानगर गॅस L) अन्य लेखी समस्या / तक्रार  नागरिकांना सविस्तरपणे देता येईल.

तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त  नागरिकांनी, ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये सहभागी  व्हावे.  यासाठी वरील नमुन्यांमध्ये अर्ज देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त ज्या नागरिकांच्या इतर काही लेखी समस्या असतील. त्याचे देखील निवेदन देता येईल, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केईम रुग्णालय परिसरातील उघडेबाबावर कारवाई होणार ?

News Desk

पुणे रेल्वे टीसीने केली प्रवाश्याला मारहान

News Desk

मुले विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,

News Desk