HW News Marathi
मुंबई

मराठा समाजाने आशिष शेलार यांना हुसकावले

मुंबई – आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईत राज्यभरातील लाखों मराठा बांधव जमले आहेत. मात्र हा मोर्चा राजकीय नेत्यांनी हायजॅक करू नये, असा सुरुवातीपासूनच आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यात घुसखोरी करू पाहणारे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना मोर्चेकऱ्यांनी हुसकावून लावले.

मोर्चेकऱ्यांनी शेलार यांना आझाद मैदानात येण्यापासून अटकाव केला. विधानसभेत जाऊन तुमचे काम करा, असे त्यांना सुनावण्यात आले. तसेच त्यांना

धक्काबुक्की झाल्याचेही वृत्त आहे.आतापर्यंतच्या मोर्चांपासून राजकीय नेत्यांना दूर ठेवण्यात आले आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना मोर्चाच्या व्यासपीठावर येऊ देण्यात आलेलं नाही. जिल्हावार मोर्चात सहभागी झालेल्या स्थानिक नेत्यांना इतर मोर्चेकरांसोबतच चालावे लागले आहे. मुंबईतील आजच्यामोर्चात त्याला अपवाद ठरू पाहणाऱ्या शेलार यांना मोर्चेकरांनी धडा शिकविला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चहापानाचा इतका खर्च ऐकून मला आश्चर्य वाटले | शरद पवार

News Desk

…तर कमला मिलला आग लागण्याचे कारण हे होते

News Desk

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

News Desk