HW Marathi
मुंबई

मुंबईच्या महापौरांचे स्थलांतर आता राणीच्या बागेत

मुंबई | मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे आता भायखळ्यातील राणीबाग परिसरातील सरकारी बंगल्यात स्थलांतरित झाले आहेत. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवाजी पार्कमधील महापौर निवासाचा ताबा सोडला आहे. त्यामुळे आता लवकरच येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. काल (बुधवार) महापौर बंगल्यात एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महानगपालिका आयुक्त अजोय मेहता आणि शिवसेनेचे अन्य काही नेते उपस्थित होते.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याच्या तळघरात होणार असल्याची माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची तोडफोड किंवा येथील वृक्षतोड देखील होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईतील महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी अपुरी पडते असल्यामुळे हे स्मारकासाठी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related posts

शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असाल तरी एकत्र आलो पाहिजे – मुख्यमंत्री

News Desk

सुट्टी सिगारेट विकण्यावर राज्य सरकारची बंदी

News Desk

पुणे रेल्वे टीसीने केली प्रवाश्याला मारहान

News Desk