नवी दिल्ली | दिल्लीकर सध्या प्रदूषणांनी हैराण झाले आहेत. भारतीय क्रिकेट टीमचा क्रिकेटर गौतम गंभीर यांनी ट्विटर हॅन्डलवरुन प्रदुषणाच्या मुद्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी(आप)वर निशाणा साधला. गंभीर यांनी केजरीवाल यांच्या टीका करताना म्हटले की, ‘आपच्या खोट्या आश्वासनांमुळे आमच्या पिढ्याला प्रदूषणात राहावे लागत आहे.’ अशा शब्दात ट्विट केले आहे.
दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्ली में जगाया AAP ने, पहले तो यहां ऑक्सिजन था, ऑक्सिजन भगाया AAP ने,” अशा शब्दात ट्विटरवरून केजरीवाल यांच्यांवर टीका केली आहे. गंभीरने केजरीवाल आणि स्वतःला टॅग करत दिल्लीतील जामा मशिद परिसरातील एक फोटो ट्विटवर शेअर केले आहे. या फोटोत मोठ्या प्रमाणात धुके दिसून येत आहेत.
“दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्ली में जगाया AAP ने, पहले तो यहाँ Oxygen था, Oxygen भगाया AAP ने।” @ArvindKejriwal @AamAadmiParty our generations are going up in smoke like your false promises. U had 1 full year to tame dengue &pollution, sadly you couldn’t control either. Wake up!!! pic.twitter.com/xePi5mubO5
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 31, 2018
गेल्या काही दिवसांपूर्वीच गौतम यांनी भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीहून लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या चर्चा सोशल मीडियात रंगल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.