HW News Marathi
मुंबई

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई | मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज (१६ जून) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. चर्चगेट ते मुंबई सेंट्रलंदरम्यान सर्व लोकल धिम्या मार्गावर धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे दिशेकडे जाणाऱ्या सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंतच्या सर्व लोकल आज रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर मेगाब्लॉक आहे. सकाळी १०.५७ मिनिटांपासून ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत कल्याण दिशेकडील लोकल जलद मार्गावर धावतील. धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर धावतील. त्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबतील. त्यानंतर, माटुंगा स्थानकावरून धिम्या मार्गावर धावतील. विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर येथे जलद मार्गाच्या फलाटाअभावी मेगाब्लॉकच्या वेळी लोकल येथे थांबा घेणार नाहीत.

पश्चिम रेल्वे जम्बोब्लॉक

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व लोकल धिम्या मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येतील.

हार्बर मार्गावरील लोकल रद्द

हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे दिशेकडे जाणाऱ्या सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंतच्या सर्व लोकल रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे, रविारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत चुनाभट्टी, वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाºया लोकल रविवारी सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईत दाखल होणार; उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार

Aprna

मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त अस्थापना आणि प्रशासनासाठीच्या खर्चाची केलेली बेगमी -सचिन अहिर

News Desk

रविवारी रेल्वेच्या विविध कामांसाठी मेगाब्लॉक

News Desk