HW News Marathi
मुंबई

आज मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई | मध्य रेल्वे मार्गावर आज (१२ मे) ठाणे ते कल्याण तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. कळवा स्थानकात तांत्रिक काम करण्यात येणार असल्याने ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाणे ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत तर दिवा ते ठाणे सीएसएमटी दिशेकडील मार्गावर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ वाजल्यापासून दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सांताक्रुझ ते माहिम स्थानकादरम्यान विरार दिशेकडील धिम्या मार्गावर जाणाऱ्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन या स्थानकांदरम्यान त्याचप्रमाणे हार्बर मार्गावर मानखुर्द ते वडाळादरम्यान शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेण्यात आला. कुर्ला ते सायन या स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री १२.४५ वाजल्यापासून सकाळी ६.१५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ल्याचा हरियाणा वाला लेन परिसर अंधारात

swarit

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजयी शुभारंभ

News Desk

‘स्वाभिमान’ दुखावताच खोतांनी शेट्टींना दिले पैसे

News Desk