HW News Marathi
मुंबई

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई । मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज (२१ जुलै) पायाभूत कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. तसेच हार्बर मार्गावरील लोकल ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणा-या जलद मार्गावर आज सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणा-या जलद मार्गावरील लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. या वेळी लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. परळ स्थानकानंतर लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. तसेच ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत कल्याण दिशेकडे जाणा-या लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबणार आहेत.

प्रवाशांसाठी पनवेल-कुर्ला विशेष लोकल

हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी-वांद्रे दिशेकडे जाणा-या लोकल सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत रद्द केल्या जातील. चुनाभट्टी-वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे जाणा-या लोकल सकाळी ११.१० वाजल्यापासून ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत रद्द केल्या आहेत. सीएसएमटी-वडाळा रोडहून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत वाशी- बेलापूर-पनवेल या दिशेकडे तसेच सीएसएमटीहून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.१६ वाजेपर्यत वांद्रे-गोरेगाव दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे पनवेल,बेलापूर, वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणा-या तसेच गोरेगाव,वांद्रेहून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणा-या लोकल रद्द केल्या जातील.

ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वरून पनवेल-कुर्ला विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक काळात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान चर्चगेट दिशेकडील सर्व धिम्या लोकल विरार,वसई रोड ते बोरीवली,गोरेगावपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील. विरार दिशेकडील सर्व धिम्या लोकल गोरेगाव ते वसई रोड,विरारपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉकदरम्यान भार्इंदर स्थानकावरून कोणतीही लोकल सुटणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा घसरली

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk

मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील जेवणात भेसळ आढळल्यास अॅट्रोसीटी नुसार कारवाई करणार

News Desk