HW News Marathi
मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज (१८ ऑगस्ट) मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड स्थानकादरम्यान, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे आज सकाळी मुंबईकरांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडल्यास त्रास कमी होऊ शकतो. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी ९.५२ वाजेपासून ते दुपारी २.४२ वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान सकाळी ११.१० वाजेपासून दुपारी ३.४० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान कुर्ला ते वाशी वाहतूक बंद राहणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ वाजेपासून ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रलंयकारी 29 ऑगस्ट

News Desk

बोरीवलीत बॉम्ब नसून लहान मुलांचे खेळणे

News Desk

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk