HW News Marathi
मुंबई

मुंबईकरांसाठी खुशखबर जुलै महिन्यात म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध होणार

मुंबई | या स्वप्न नगरीत राहणारा प्रत्येकजण मुंबईत घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. त्या सर्व मुंबईकरांसाठी खुशखबर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई मंडळाच्या १,००० म्हाडाच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात दिल्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हाडाची सोडत काढण्यात येणार आहे. यंदा म्हाडाच्यया अत्यल्प उत्पन्न गटात ८०० आणि मध्यम उत्पन्न गटात २०० घरे मुंबईकरांसाठी उपलब्ध असणार आहेत. म्हाडा मुंबई आणि उपनगर असे मिळून एकूण १,००० घरांची लॉटरी काढत आहेत.

  • मुंबईकरांसाठी म्हाडाची घरे

बोरीवलीतील महावीरनगर, गोरेगाव, विक्रोळीमधील कन्नमवारनगर, घाटकोपरमधील पंतनगर, अ‍ॅण्टॉप हिल, मुलुंडमधील गव्हाणपाडा, मानखुर्द या ठिकाणी या वर्षी म्हाडाची घरे लॉटरीसाठी उपलब्ध असतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रॉफर्ड मार्केटच्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास कामाला गती मिळणार   

Gauri Tilekar

जय जवान गोविंदा पथकाची मुख्यमंत्र्यांना अनोखी सलामी

News Desk

Breaking News | चेंबूर मधील बीपीसीएल मध्ये स्फोट

News Desk