HW News Marathi
मुंबई

धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग

मुंबई | गोरेगावमधील कामा इंडस्ट्रीमध्ये सोमवारी (२९ एप्रिल) मध्यरात्री २.३० च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या गोदामातील सामान जाळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या १२ पेक्षा जास्त गाड्या यावेळी घटनास्थळी दाखल होत्या. अग्निशमन दलाच्या ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान, ही आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोळीवाड्यात कच-याचे साम्राज्य

News Desk

महाराष्ट्र बंद मागे, दोषींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

News Desk

अर्ध्या तासापासून हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk