HW News Marathi
मुंबई

युवासेनेनं मुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळं फासलं

गौतम वाघ

उल्हासनगर: शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा राज्य शासनाकडे प्रलंबित असतांना उल्हासनगर भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी महापौर मीना आयलानी व अन्य भाजप नेत्यांनी बॅनरद्वारे” शेतकऱ्यांना राज्य शासनाने कर्ज माफी केल्याबद्दल अभिनंदन ” अशा शुभेच्छा दिल्या आहेत . यामुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून आज उल्हासनगर युवा सेनेच्या कार्यकत्यानी संतप्त होवून मुख्यमंत्री व माजी आमदार कुमार आयलानी यांच्या बँनर वरील फोटोला काळे फासून निषेध व्यक्त केला. देशभर व राज्यभरातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करीत असून ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत .

अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून शेतकरी व राज्य सरकार मधील मतभेद उफाळून आले आहेत. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अद्याप राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही . असे असतांना भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी ,त्यांची पत्नी महापौर मीना आयलानी व अन्य कार्यकर्त्यांनी बॅनर्स राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे . हे बॅनर्स महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ व अन्य ठिकाणी लागले आहेत . या संदर्भात शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत . शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी म्हणाले कि हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे . अद्याप शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसतांना त्याचे श्रेय देण्याची घाई या भाजपच्या नेत्यांना झाली आहे .सोशल मीडियावर देखील कुमार आयलानी व मीना आयलानी यांच्या बॅनर्सची खिल्ली उडविण्यात येत आहे . या पूर्वी देखील एका कार्यक्रमाच्या समारंभात माजी आमदार कुमार आयलानी यांनी शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर बेशिस्तपणे हात ठेऊन त्याची छायाचित्र काढल्याचे प्रकरण त्यांच्या चांगल्याच अंगाशी आले होते . मात्र त्या प्रकरणानंतर देखील आयलानी यांनी बोध घेतला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.आज उल्हासनगर मनपा मुख्यालया समोर लावलेल्या बँनवर युवासेनेचे उपशहर अधिकारी बाळा श्रीखंडे, संदीप गायकवाड, अक्षय धोत्रे, जावेद शेख, व ईतर कार्यकत्यानी संतप्त होवून मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व भाजपाचे माजी आमदार कुमार आयलानी यांच्या बँनरवरीलल फोटोला काळे फासून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघरमध्ये २४ तासांत ४ भूकंपाचे धक्के

News Desk

पाऊस आला रे…

News Desk

चैत्यभूमी येथे कायमस्वरूपी भिमज्योती

News Desk