HW News Marathi
मुंबई

मनसे स्टाईल सोडून मुक मोर्चाकडे मनसे 

मुंबई – रेल्वे स्थानका बाहेर असलेल्या फेरीवाल्यांना 15 दिवसात हटवले नाही तर मनसे स्टाईलने त्यांना हटवू असा इशार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र या इशाऱ्याच्या अगदी विरूद्ध आज मनसे कार्यकर्त्यांनी दादर मध्ये कृती केली. त्यांनी मुकमोर्चा काढून फेरीवाल्यांना विरोध केला. या मोर्चाला कोणतही परवानगी शिवाजी पार्क पोलिस स्थानकाने दिली नव्हती.

शिवाय या मोर्चा दरम्यान काही अनुचित प्रकार होवू नये म्हणून पोलिसांनी या मुक मोर्चात सहभागी झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यात माजी आमदार नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, राजन पारकर, रिटा गुप्ता यांच्यासह 50 ते 60 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत फेरीवाल्यांचा निषेध व्यक्त केला.

परळ रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्घटने नंतर राज ठाकरे यांनी आक्रोष मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाला 15 दिवसांचा वेळ देत रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही फेरीवाले दिसत असल्याने मुंबई ठाण्यात अनेक ठिकाणी मनसे सैनिकांनी फेरीवाले हटाव मोहीम हातात घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खाजगी बस अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी

News Desk

सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून चुकीचे पायंडे पाडू नका; अजित पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल

Aprna

सचिन सावंत हत्येप्रकरणी 7 जणांना अटक  

News Desk