HW News Marathi
मुंबई

मनसेने कंबर कसली! लवकरच मुंबईत होणार पदाधिकाऱ्यांचा मेळावा

मुंबई | आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या मोर्जेबांधणीला आता हळूहळू सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या निवडणुकांसाठी आपली कंबर कसली आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक, पुण्याचे दौरे केले आहेत. ज्यात बैठका, संघनात्मक बदल, स्थानिक समस्यांवर चर्चा होताना दिसून आली आहे. त्यानंतर, आता लवकरच राज ठाकरे मुंबईतही पुन्हा जोमाने सुरुवात करणार आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थित येत्या २३ ऑक्टोबर रोजी भांडुपमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल

मनसेकडून सध्या विशेषतः नाशिक, पुणे, ठाणे मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या ठिकाणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. स्वतः राज ठाकरे या निवडणुकांच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. याद्वारे संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला जात आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबरला भांडुपमध्ये आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात राज ठाकरे हे पक्षबांधणी, राजकीय रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार आहे.

भाजप-मनसे एकत्र दिसणार का?

मनसेला राज्यात फारसं मोठं यश अद्यापही मिळवता आलेलं नाही. त्यातच, पक्षाने आता हिंदुत्वाची कास धरलेली आहे. मात्र, येत्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला या प्रखर हिंदुत्त्ववादाचा फायदा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबईत भाजप आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चांप्रमाणे आगामी निवडणुकांमध्ये भाजप-मनसे एकत्र दिसणार का? प्रखर हिंदुत्त्वाचा मुद्दा कामी येणार का? पक्षाला अपेक्षित यश मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे फर्मान!

News Desk

आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का; कार्यकर्त्याचा अजित पवारांना सवाल

News Desk

मुंबई विद्यापीठाविरोधात विद्यार्थी न्यायालयात

News Desk