नवी मुंबई | सायन-पनवेल मार्गावर खड्ड्याने रस्त्याची चाळ झाली आहे. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते. या कारणामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी) कार्यालयाची तोडफोड केली आहे.
खड्डे बुजवण्याची मागणी करून देखील प्रशासन दखल घेत नव्हते. शेवटी मनसेने त्यांच्या स्टाईलने पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात तोडफोड करून खळखट्याक करून खड्ड्या विरोध आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या १० दिवसापासून उरणफाटा व जुईनगर येथे खड्ड्यामुळे बाईक अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खात्याचे मंत्री व पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही मनसेने पोलिसांकडे केलेली आहे.
#WATCH: Maharashtra Navnirman Sena (MNS) workers vandalise the office of Public Works Department in Navi Mumbai over incidents of pothole deaths in the state. #Maharashtra pic.twitter.com/IT4qQpfMAW
— ANI (@ANI) July 16, 2018
या आंदोलनात तुर्भेतील मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, संचिव संदीप गलुगडे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आहे. मनसेच्या या तोडफोडीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.