पुणे | मल्टिप्लेक्सच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहाच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पुण्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआरमध्ये या सिनेमागृहात ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का विकता अशी विचारणा करत मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात मनसेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी आणि पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा समावेश होता.
#WATCH Pune: Maharashtra Navnirman Sena(MNS) workers thrash a movie theatre manager during a protest over high prices of food items in the theatre. (28.6.18) (Note: Strong Language) pic.twitter.com/UEEBOYiuKz
— ANI (@ANI) June 29, 2018
मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती अव्वाच्या सव्वा दराने विकत असल्यामुळे नुकतेच उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायलायाने निर्णय दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पॉपकॉर्नचे दर तपासले. त्यानंतर मनसे कार्मचाऱ्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाणून मारहाण केली. मनसेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांच्या विरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून या कार्यकर्त्यांना एक दिवसीय कोठडी सुनावण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.