HW News Marathi
मुंबई

खड्यात उतरून शिवसैनिकांचे आंदोलन  

मुंबई | शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना धारावी विधानसभा उपविभाग प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, शाखा प्रमुख संजय काळे, किरण काळे, नगरसेवक वसंत नकाशे यांनी धारावी 90 फूट रोड खड्डे मुक्त व्हावा यासाठी खड्यात उतरून बुधवारी आंदोलन केले.

4 महिन्यापासून दुरुस्ती साठी खोदलेला रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा रमजान लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवाना परिसरात असलेल्या मज्जीद मध्ये नमाज पडताना त्रास होऊ नये यासाठी शिवसैनिक रस्तावर उतरल्याचे चित्र बुधवारी धारावीच्या 90 फूट रोड परिसरात पहायला मिळाले.

महापालिकेने लक्ष घालून जर हा रस्ता दुरुस्त केला नाही तर प्रशासनाविरुद्ध शिवसेना तीव्र आंदोलन करेन असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंबरनाथमध्ये शाळेच्या फिवाढी विरोधात विद्यार्थ्यांसह मनसेचं उपोषण

News Desk

खड्ड्याने घेतला बाइकपटुचा बळी

News Desk

अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या उंचीला पर्यावरण खात्याची मंजूरी 

News Desk