HW News Marathi
मुंबई

मुंबई व गोवा क्रुझ सेवा सुरु होणार

मुंबई | तब्बल २७ वर्षांनंतर मुंबई व गोवा क्रुझ सेवा सुरु करण्यात येणार आहे. मुंबईकर आणि गोवाकरांच्या दृष्टीने हि अत्यंत आनंदाची बातमी समजली जात आहे. मुंबई व गोवा प्रवासासाठी गुरुवारपासून क्रूझच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. चाचणीसाठी क्रूझ मुंबईहून गोव्याला पाठविण्यात आले आहे.

क्रुझच्या या चाचण्या यशस्वी झाल्या तर ही सेवा तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. अन्यथा पावसाळा संपेपर्यंत सर्वांना वाट पहावी लागणार हे निश्चित आहे. मुंबई गोवा मार्गावर क्रूझ सेवा सुरू करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रयत्नशील होती. त्यादृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरु आहे. अनेक गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर या मार्गावर क्रूझ सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

क्रूझसेवेची खास वैशिष्ट्ये

  • 400 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता
  • मुंबई ते गोवा प्रवासाचे किमान भाडे 7,500 रुपये
  • भाड्याची सात प्रकारात वर्गवारी
  • मुंबई ते गोवा हे अंतर अवघ्या १५ तासांचे
  • प्रवाशांना २ वेळचे जेवण व नाष्टा
  • क्रूझवर स्विमिंग पूल, ७ बार आणि २ रेस्टॉरन्ट,
  • क्रूझवर असणार ‘स्पा’ची सुविधा
  • हा प्रवास कोणत्याही बंदरात न थांबता सलग असेल
  • व्हिक्टोरिया डॉकमधून क्रूझ प्रवासाला सुरुवात

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

News Desk

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

Aprna

दिवसाढवळ्या त्याने पॅंटेची चैन खोलून दाखवली

News Desk