HW Marathi
मुंबई

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | सीएसएमटी स्टेशनजवळीत हिमालय पूल दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या काल (१८ मार्च) नीरजकुमार देसाई या स्ट्रक्‍चरल ऑडिटरला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात देसाई यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “हा आरोप प्रत्यारोपचा  खेळ नाही. या दुर्घटनेमागे स्ट्रक्चरल ऑडिटरचा निष्काळीजीपणा असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, याची योग्य ती दखल घेतली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.” सीएसएमटी स्टेशनजवळीत हिमालय पूल शनिवारी (१६ मार्च) कोसळाला होता. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले होते.

या पुलाची दुरूस्ती करणार्‍या आरपीएस कंत्राटदाराला शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.  या घटनेनंतर नोटीसला उत्तर देण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. हिमालय पुलाची २०१३ मध्ये या पुलाची दुरूस्ती आरपीएस या कंत्राटदाराने केली होती. २०१७-१८ यादरम्यान या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये पुल धोकादायक नससल्याचे सांगत किरकोळ दुरूस्तीची असल्याचे देसाई याने सांगितले होते.

 

 

Related posts

अनोख्या पद्धतीने वैलेंटाइन डे साजरा

News Desk

आम्हांला संपूर्ण कर्जमुक्ती अपेक्षित – राज ठाकरे

News Desk

मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर दिवसाकालीन ब्लॉक रद्द

News Desk