HW Marathi
मुंबई

Mumbai Dongri Building Collapsed : बचावकार्य युध्दपातळीवर सुरू | मुख्यमंत्री

मुंबई |  डोंगरीत ४ मजली  केसरबाई इमारतीचा निम्मा भाग कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीचे नाव केसरबाई असून या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांना वाचविण्या आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  घटनास्थळी एनडीआरफची टीम दाखल झाली आहे.

या इमारतीत १५ कुटुंबे राहत होते. त्यामुळे या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. कोसळलेली इमारत १०० वर्षे जुनी असून इमारतीच्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पुनर्विकासासाठी विकासकाला काम दिले होते असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यांशी बोलताना सांगितले. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री विखे-पाटील यांनी दिली आहे.

 

Related posts

दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर

News Desk

रामदास आठवले लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार

News Desk

गांधी जयंती निमित्त सीएसएमटी स्थानकात कर्मचाऱ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

News Desk