HW News Marathi
मुंबई

श्वानांच्या विष्ठेमुळे मुंबईकर हैराण, जी उत्तर विभागाचा श्वानमालकांना दणका

धनंजय दळवी | घरात कुत्रे पाळायला आवडतात. मात्र त्यांची विष्ठा चालत नाही. त्यासाठी जणू महापालिकेने रस्ते, फुटपाथ मोकळे सोडले आहेत, अशी धारणा असलेल्या काही श्वानमालकांना जी उत्तर विभागाने दणका दिला आहे. या मालकांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करून जोरदार दणका दिला आहे. दादर, माहीम परिसरात ८५ केसेसची तपासणी केली असता ४२ जणांकडे साधने नव्हती. त्यामुळे पालिकेने तब्बल ४२ व्यश्वानमालकांवर बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ नुसार कारवाई करून प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली आहे. तसेच श्वानांची विष्ठा घरी कशी करून घ्यावी याचे प्रशिक्षणही दिले. आतापर्यंत २१००० दंड जमा करण्यात आला आहे. जी उत्तर विभागाच्यावतीने परिसरात ६० ठिकाणी जनजागृतीचे फलक देखील लावण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणे, रस्ते वा पदपथांवर अनेक श्वानमालक किंवा संबंधित केअर टेकर हे आपल्या घरातील पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येत असतात. अशावेळी अनेकदा रस्त्यावर, पदपथावर वा सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा उत्सर्जन करतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ होण्यासोबतच आरोग्याचा प्रश्नही उद्भवू शकतो. हे लक्षात घेऊन पालिकेच्या जी उत्तर विभागाने याबाबत विशेष जनजागृती मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येणाऱ्या व्यक्तींचे प्रबोधन केले जाते.

रस्त्यावरील विष्ठा उत्सर्जन रोखण्यासाठी पालिकेने ३२ व्यक्तींचे पथक कार्यरत केले आहे. हे पथक विविध ठिकाणी फिरुन व पाहणी करुन पाळीव प्राण्यांच्या मालकांशी संवाद साधत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर विष्ठा उत्सर्जित केल्यास अशी विष्ठा उचलण्यासाठी ‘शिट लिफ्टर’ हे उपकरण वापरुन विष्ठा कशी उचलावी व ती परिसरातील कच-याच्या डब्यात कशी टाकावी ? याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलिसांना लोकल प्रवास मोफत

News Desk

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध बालकराकाराचा रेल्वे मृतदेह सापडल्याने खळबळ

swarit

गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नाही – अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk