रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. सोमवारी दिवसभर सुरू असलेला पाऊस रात्रभर सुरूच असून नागरिकांचे हाल झाले आहेत. मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आज मंगळवारी, मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर, राज्य सरकारने रात्री उशिरा मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
The Government of Maharashtra has declared a public holiday in Mumbai today, for safety of Mumbai city & its citizens, in wake of the very heavy rainfall forecast by IMD #MumbaiRainsLiveUpdates #MumbaiRains #MumbaiRainsLive #MCGMUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 1, 2019
मुंबईवरील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे
मुंबई शहरासाठी देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये.#MumbaiRainsLive #MumbaiRainsLiveUpdates #MumbaiRains
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.