HW News Marathi
मुंबई

मुंबई पोलिसांकडून दाऊदच्या पुतण्याला अटक

मुंबई | कुख्यात अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्या आणि इक्बाल कासकरचा मुलगा रिझवानला खंडणीखोरी प्रकरणी मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. मुंबई विमानतळावर बुधवारी (१७ जुलै) रात्री पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. रिझवान देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत असताना खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अहमद रझा वधारिया याला अटक केली होती. दाऊदच्या टोळीचा खंडणीखोर फहीम मचमच याचा तो जवळचा साथीदार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वधारियाच्या चौकशीदरम्यान रिझवानचे नाव पुढे आले होते. यानंतर गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार रिझवान देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावर सापळा रचत त्याला अटक केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग

swarit

मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी 

swarit

इंदिरा गांधीवरील ठरावावरून दोन्ही कॉँग्रेस आमने-समाने

News Desk