मुंबई | मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून सुबोध जयस्वाल यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर आज सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पडसलगीकर यांच्याकडे सध्या मुंबईचे आयुक्तपद आहे. पडसलगीकर महासंचालक झाल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जातेय.
दत्ता पडसलगीकर देखील येत्या ऑगस्ट अखेरीस सेवाज्येष्ठतेनुसार निवृत्त होतील. मात्र त्यांची ३६ वर्षांची प्रामाणिक सेवा लक्षात घेऊन त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून एच डब्लू ला प्राप्त झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत पडसलगीकर महासंचालकपदी राहतील.
सुबोध जयस्वाल यांचा अल्प परिचय
- १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल
- भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ’मध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत
- तेलगी स्टॅंम्प पेपर घोटाळ्याचे वरीष्ठ अधिकारी
- २००६ मुंबईच्या बॉम्बस्फोट प्रकरण तपास पथकात सहभाग
- मुंबई पोलिसात अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.