HW News Marathi
मुंबई

मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी केली शस्त्रांची पूजा

मुंबई | मुंबईच्या नागरिकांच्या सेवेसाठी चोवीस तास सज्ज असणारे मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे आणि समाजाचे रक्षण करणाऱ्या शस्त्रांचे दसऱ्यानिमित्ताने पूजन केले. दहशतवाद्यांशी दोन हात करताना विरमण समोर असतानासुद्धा न डगमगणारा पोलीस कर्मचारी फक्त आपल्या हातात असणाऱ्या शस्त्राच्या भरोशावर निर्भीड असतात आणि म्हणून वर्षातील एक दिवस त्या शस्त्रांची पुजा करून त्यांना मानवंदना दिली जाते.

विजया दशमीच्या निमित्ताने आज मुंबई पोलिसांनी त्यांना प्रत्येक लढाईमध्ये मदत करणाऱ्या शस्त्रांची पूजा केली. मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था देवेन भारती आणि इतर सहकारी कर्मचारी वर्ग यांच्यासोबत शस्त्रांची पुजा करण्यात आली. अखंडपणे सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची श्रध्दा असलेल्या शस्त्रांची मनोभावे सेवा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

News Desk

ओमी कालानीचा भाजपा प्रवेश धमाका ठरणार की फुसका बार?

News Desk

शिक्षण उपसंचालकाला ११वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या मुदतवाढीसाठी घेराव.

News Desk