HW News Marathi
मुंबई

मुंबईला पावसाने झोडपले

मुंबई आणि उपनगरात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. यामुळे गांधी नगर मार्केट आणि दादारच्या तिलक ब्रिजसहीत अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. याठिकाणी पाणी काढण्यासाठी 79 पंप लावण्यात आले आहेत. यातील 38 पंप मुंबई शहरात तर 26 पंप पुर्व उपनगरात लावण्यात आले असून 15 पंप पश्चिम उपनगरात लावण्यात आले.

बीएमसीकडे एकून 313 पाणी काढण्याचे पंप आहेत. हे पंप जिथे पाणी भरते अश्या ठिकाणी लावण्यात येते अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली. मंगळवारी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान दादार परिसरात 11 मिलीमीटर , विक्रोलीत 24 मिलीमीटर, दिडोंशी 18 मिलीमीटर , बीकेसी 11 मिलीमीटर आणि वांद्रे येथे 10 मिलीमीटर पाऊसाची नोद करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता कोलाबा परिसरात ऑब्जर्वेटरीमध्ये 58.8 मिलीमीटर, सांताकृज येते 12.8 मिलीमीटर पाऊसाची नोद झाली आहे.

दोन दिवस सतत पाऊस होत असल्याने बेस्ट बस आणि लोकल रेल्वे उशीराने धावत आहे. यामुळे प्रवाश्यांना ऑफीसला जाण्यासाठी उशीर होत होत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 24 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्याता वर्तवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युवासेनेनं मुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळं फासलं

News Desk

National Youth Day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk

भाजपच्या नाना पटोलेची उद्धव ठाकरेंसोबत दोन तास चर्चा

News Desk