HW News Marathi
मुंबई

गुन्हे शाखेचे अति. आयुक्त प्रसन्न यांचे अधिकार काढून घेतले

मुंबई: सहकाऱ्यांशी उद्धट वर्तन, महिला कर्मचाऱ्यांशीअयोग्य वर्तन आणि कामावर वेळेत न येणे या गोष्टीमुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) केएमएम प्रसन्नायांना भोवल्या आहेत. त्यांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी घेतलाआहे. त्यांच्याबद्दल पोलीस दलातील महिलांसह अनेककर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.

काल त्यांना पोलीस आयुक्तांनी बोलावून घेत, यापुढे गुन्हेशाखेच्या केवळ प्रशासकीय बाबींच तुम्ही हाताळा, असेप्रसन्ना यांना बजावल्याचे कळते. पूर्ण गुन्हे शाखेचीजबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे. याबैठकीला गुन्हे शाखेचे सहआयुक्त संजय सक्सेना हेहीउपस्थित होते. यापुढे कोणत्याही कनिष्ठ अधिकाऱ्यालाकाम देण्याचे अधिकार प्रसन्ना यांच्याकडे ठेवण्यातआलेले नाहीत. तसेच त्यांच्या हाताखालील तीनउपायुक्तांनाही आता थेट सक्सेना यांनाच रिर्पोटकरण्यास सांगण्यात आले आहे.

या कारवाईनंतर प्रसन्ना प्रसिद्धी माध्यमांचे कोणतेहीकॉल स्वीकारत नाहीत. परंतु, त्यांच्या वागण्यातीलमग्रुरीच त्याला भोवल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणेआहे. गेल्या काही महिन्यांपासून ते वरिष्ठांच्या रडारवरहोते. काही आठवड्यांपूर्वी पोलीस आयुक्तांनी प्रसन्नायांच्या चेंबरमध्येच आढावा बैठक घेतली होती. त्यालाहीते तब्बल अर्धा तास उशिरा आले होते. तसेचकार्यालयातील काही महिलांशी त्यांचे वर्तन अयोग्य होते.या गोष्टी विचारात घेत, पोलीस खात्यातील शिस्त कायमठेवण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलीसआयुक्तालयातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

निवासी भागात फटाके विक्रीधारकांविरुद्ध आझाद मैदानात आंदोलन

swarit

शौचालयासाठी कंत्राटदारांना मुदतवाढ, दोन वर्षांत दोन हजार शौचालये बांधली जाणार ?

News Desk