मुंबईः मुंबई व उपनगरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहेत. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसाने 26 जुलैच्या पावसाची मुंबईकरांना आठवण झाली. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मागील २४ तासांमध्ये मुंबईत १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील दुपारच्या सत्रातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे बंद असून मध्य रेल्वे अत्यंत संथ गतीने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईचा वेग अतिशय मंदावला आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडतो आहे. सकाळपासूनच मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसाने झोडपून काढल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईत आज सुरू असलेला पाऊस २६ जुलै २००५ नंतरचा सर्वाधिक पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मागील २४ तासांमध्ये मुंबईत १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी,बांद्रा, दादरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील दुपारच्या सत्रातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे बंद असून मध्य रेल्वे अत्यंत संथ गतीने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईचा वेग अतिशय मंदावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.