HW News Marathi
मुंबई

मुंबईतील पुलांच्या डागडुजीसाठी पालिकेने रेल्वेला दिले ११४ कोटी रुपये 

विशाल पाटील । मुंबईतील सीएसटी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंतच ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी एलफिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर अंधेरी येथील गोखले पूल आणि आता मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील पुलाची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर संबंधित पुलाची जबाबदारी रेल्वेने झटकली होती. रेल्वे प्रशासनकडून जबाबदारी वारंवार झटकली जात असली तरी गेल्या १० ते १२ वर्षात पालिकेने रेल्वेला ११४ कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पैशातून पुलांची डागडुजी होते का असा सवाल केला जातो आहे. रेल्वे प्रशासनाचे पुलांकडे दुर्लक्ष आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत २७४ तर रेल्वे प्रशासनाच्या ४५५ हद्दीत ऐवढ्या पुलांची संख्या आहेत. एलफिन्स्टन आणि अंधेरी येथील पुलांच्या दुर्घटनेनंतर पुलांचे स्टक्चरल ऑडीट करण्यात आले होते. सीएसएमटी येथील पूलाचेही ऑडिट करण्यात आले होते. त्यात काही छोट्या दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या. या पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करावा म्हणून स्थायी समितीकडे सादर करण्यात आला. हा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी होण्यापूर्वी त्याच्या आधी सीएसएमटी जवळील पादचारी पूल कोसळला आहे.

सीएसएमटी येथील पूल कोसळल्यावर रेल्वेने आपली जबाबदारी झटकली असून पालिकेने मुंबईमधील पालिकेच्या पूल विभागाने २०१० पासून २०१८ पर्यंत मध्य रेल्वेला ९४ कोटी ४४ लाख ९१ हजार ८७० रुपये तर पश्चिम रेल्वेला २००८ ते २०१८ या कालावधीत १८ कोटी ५ लाख २४ हजार १७३ रुपये असे एकूण ११४ कोटी ५० लाख १६ हजार ४३ रुपये पुलांच्या डागडुजीसाठी दिले आहेत. पालिकेकडून रेल्वेला असे कोट्यवधी रुपये दिले जातात. मात्र तो निधी खर्च कुठे गेला जातो याचा पाठपुरावा करण्यासाठी कोणताही विभाग नाही. यामुळे या निधीचा वापर करून रेल्वेने आपल्या हद्दीतील किती पुलांची डागडुजी केली हे समोर आलेले नाही.

 

२०१० ते २०१८ पासून पुलाच्या डागडुजी पालिकेने रेल्वेला खर्च

  • मध्य रेल्वे – ९४ कोटी ४४ लाख ९१ हजार ८७० रुपये
  • पश्चिम रेल्वे – १८ कोटी ५ लाख २४ हजार १७३ रुपये

    एकूण ११४ कोटी ५० लाख १६ हजार ४३ रुपये

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk