HW News Marathi
मुंबई

मुस्तफा डोसाचा हार्टअटॅकनं मृत्यु

  • डोसा मुंबईतल्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी

मुंबई – १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी मुस्तफा डोसाचा आज हार्टअटॅकनं मृत्यु झालाय. काल रात्री डोसाच्या छातीत दुखत असल्यामुळं त्याला जेजे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावणारा दोषी आरोपी मुस्तफा डोसाला काल रात्री अचानक छातीत दुखू लागलं होतं. त्यामुळे काल रात्री 1 वाजता त्याला मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्याच्यावर तीन तास उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.

अनियंत्रित अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं. मात्र, उपचारानंतरही आज त्याचा मृत्यू झाला. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुस्तफा डोसाला विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी डोसाला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. न्यायालय दोषींना काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हजारों कोटींची जमीन खाजगी कंपनीला दिली फक्त 54 कोटीत, काँग्रेसच्या मंत्र्यांचा प्रताप  

News Desk

मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, २० ते २५ मिनिटे लोकल ट्रेन उशिराने

News Desk

तुकाराम मुंढेची बदली, मंत्रालयात सहसचिवपदी नियुक्ती

News Desk