HW News Marathi
मुंबई

आता नवरात्रोत्सवाला ऑनलाईन परवानगी

मुंबई । महानगरपालिकेने नवरात्रोत्सवाच्या मंडपांसाठी ऑनलाईन परवानगी देण्याचा निर्णय घेतला.याआधी गणेशउत्सवसाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आली होती. नवरात्रोत्सवाची परवानगी घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. या सर्व मंडपांना उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार परवानगी देण्यात येणार आहे. महानगरपालिकेने या वर्षांपासून सण उत्सवात लागणाऱ्या सर्व परवानग्या या ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत.

उच्च न्यायलायच्या नियमांमध्ये न बसणाऱ्या मंडळांना परवानगी देणार नाही. पदपथ मोकळे ठेवणे, वाहतुकीला अडथळा न येऊ देणे, अग्निशमनाचे नियम इत्यादी या सर्व अटी पाळणे गरजेचे आहे. नवरात्रोत्सवादरम्यान बेकायदेशीर मंडप उभे राहू नयेत याची दक्षता पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

दांडिया सुरु असताना डेंग्यूच्या रोगापासून बचाव करण्यासाठी नवरात्रोत्सवा आयोजकांना लोकांचे प्रबोधन करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात सांगितले असून त्यासाठी सर्व मंडळांना चित्रफीत व ध्वनिफीत देण्यात आली आहे. तसेच दांडिया दरम्यान मंडपाच्या बाहेर बेकायदेशीर खाण्याचे स्टोल लावले जातात .उघड्यावरचे खाल्याने आजार पसरण्याची शक्यता असते त्यामुळे त्या खाण्याच्या दुकानावर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांसाठी खुशखबर जुलै महिन्यात म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध होणार

News Desk

शेतीतील गुंतवणुक वाढवुन शेतक-यांना आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प राज्यमंत्री -सदाभाऊ खोत

News Desk

कर्जत येथे जमिनीतून धूर आणि गरम वाफ

News Desk