HW News Marathi
मुंबई

कर्जतमध्ये नीरव मोदीची तब्बल २५५ एकर जमीन

कर्जत | नीरव मोदीच्या नावाने कर्जत तालुक्यातील खंडाळा व कापरेवाडी या गावाच्या हद्दीत तब्बल २२५ एकर जमीन असल्याचे उघडकीस आले आहे. या जनिनीच्या सातबाऱ्यावर नीरव मोदींचे नाव असून बाकीच्या जमीनीवर फायर स्टोन कंपनीचे नावे आहे. नीरवने मुंबईतील गोयल नावाच्या व्यक्तीकडून प्रत्येकी ५० हजार रुपये एकराप्रमाणे जमीन विकत घेतली होती.

खरेदी केलेल्या जमीनीवर सोलर प्लँट बनवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयने हा सोलर प्लँट सुद्धा सील केला आहे. खंडाळा येथे त्यांच्या नावाने २५ एकर जमिनी आहे. खंडाळा आणि कापरेवाडी या परिसरात त्यांच्या मालकीची जवळपास २२५ एकर जमीन अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे.

तसेच कर्जत शहरापासून ५ किलोमीटर आंतरावर खंडाळा, गोयकरवाडा, वाघनळी या तीन गावात तब्बल ५०० एकरची डोंगरा परिसर आहे. तर त्यातील बहुतांश जमीन खंडाळ्यात येतो. इतर भागात दगड-धोंडे असल्याने येथे काही पीकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनसेच्याच कार्यकर्त्यांच्या दुकानांवर इंग्रजी पाट्या

News Desk

मुंबईच्या महापौरांचे स्थलांतर आता राणीच्या बागेत

Gauri Tilekar

पालघरच्या चांदीत रेती बंदरावर जिलेटीनसह स्फोटके सापडली

News Desk
मुंबई

श्रीदेवींचे पार्थिव आज दुबईहून मुंबईत दाखल होणार

swarit

मुंबई | अभिजात सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘चांदणी’ श्रीदेवी निखळल्याने सर्व सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.शनिवारी (24 फेब्रुवारी) रात्री संयुक्त अरब अमिरातमधल्या अबुधाबीत कार्डिअॅक अरेस्टने बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्या अवघ्या 54 वर्षांच्या होत्या.

श्रीदेवींचे पार्थिव सकाळी ११ वाजेपर्यंत दुबईहून मुंबईला आणण्यात येणार आहे. शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणी अहवालावर दुबईत होत असलेली कायदेशीर प्रक्रिया रविवारी वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी उद्योगपती अनिल अंबानी यांचे चार्टर्ड प्लेन दुबईला रवाना झाले आहे. 13सीट्सचे हे खासगी चार्टर्ड प्लेन आहे.

मुंबईतील वर्सोवा येथील भाग्य बंगल्यात श्रीदेवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझमध्ये अंत्यसंस्कार होईल.

Related posts

कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे

News Desk

कुलगुरूंना हटवताना राज्यपाल दबावाखाली होते का-मुणगेकर यांचा सवाल

News Desk

Dahi Handi | दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

News Desk