HW News Marathi
मुंबई

मुंबई महापालिकेतही आता होणार महाभरती

मुंबई | देशाची आर्थिक स्थिती आणि रोजगार उपलब्धीवर आलेले संकट आता हळूहळू दुर होताना दिसत आहे. पोलीसांच्या मेगा भरतीनंतर आता मुंबई महापालिकेतही महाभरती होणार आहे. लिपिक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्जकर्त्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून जावे लागणार आहे. पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गातून अनेक अर्ज येण्याची अपेक्षा आहे.

या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षाही होणार आहे.

राज्य सरकारच्या महाआयटी आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांनी ही परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महाऑनलाइन ही सरकारी कंपनी भरती प्रक्रिया राबवणार असल्याने जाहिरातीद्वारे निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. बुधवारी (२२ जानेवारी) होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बचावासाठी डॉक्टरांची “डोकॅलिटी”

News Desk

रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही, प्रवाशांमध्ये उत्साह

swarit